बेळगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला केपीटीसीएल रोड स्मार्ट सिटी योजनेतून स्मार्ट करण्यात येत आहे. हा स्मार्ट रोड लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
हा रोड तयार करण्याची पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे. मध्ये रोड, दोन्ही बाजूला ड्रेनेज लाईन, त्यानंतर दोन्ही बाजूंना उद्यान, सायकल ट्रॅक तसेच अंडरग्राऊंड सर्व केबल व गॅस लाईन घालण्याची सोय या रस्त्यावर असणार आहे.
अशा प्रकारे सर्व सुविधा असलेला आणि पुन्हा कधीच कुठल्याही कामासाठी खुदावा न लागणारा हा रस्ता असणार आहे. बेळगावच्या पूर्ण शहरातील असा हा पहिलाच रस्ता असून तो लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
या रस्त्याचे काम आता पूर्ण होत आले आहे. उशीर, निधीचा विनियोग करण्यात टाळाटाळ यातून भ्रष्टाचाराचे आरोप हे झाले पण एक सुंदर रस्ता नागरिकांना मिळणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेच्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग करून असे रस्ते अनेक ठिकाणी करण्याचे उद्देश आहेत त्यापैकी कामे सुरू आहेत पण पहिल्यांदा सेवेत येण्याचा मान या रस्त्याला मिळणार आहे.