कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी आज प्रचंड मोर्चा व घेराव घालून तसेच बैल, गाई व म्हशी या जनावरांसमवेत विकासाच्या नावाखाली हक्क हिरावून घेणाऱ्या विरोधात एल्गार केला आहे.
जनावरे धुणाऱ्या शेतकऱ्यांचा हक्क असणारा तलाव विकास कामाच्या नावाखाली हिरावून घेण्याच्या या प्रकाराला प्रातिनिधिक स्वरूपात यापूर्वी निषेध करण्यात आला होता पण काम सुरूच ठेवण्यात आले होते.
या प्रकाराला विरोध करण्यासाठी शेतकरी त्या तलावाच्या काठावर जमले होते. त्यांनी निषेध केल्यामुळे अधिकारी आणि विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना दडपणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सोमवारी सकाळी कणबर्गी येथील संतप्त शेतकऱ्यांनी 150 हुन अधिक जनावरे बकरी तलावात घुसवली आणि आंदोलनाला सुरुवात केला सुरू असलेला काम बंद केलं यावेळी माळ मारुती पोलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेतली.
सोमवारी सकाळी शेतकऱ्यांनी तलावात आपली जनावरे घुसवली. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी याबद्दल माळमारुती पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस अधिकारी दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांसमोरही आपली भूमिका सांगितली. हवेतर आम्हाला अटक करा पण आम्ही आमचा हक्क सोडणार नाही असा इशारा पोलिसांना दिल्यामुळे पोलीस सुद्धा हतबल झाले.
एक लोकप्रतिनिधींचे शेतकऱ्यांना अटक करा हे विधान वादात अडकले होते त्यावरून अटक करण्यासाठीच पोलीस आल्याचे समजून शेकडो शेतकरी अटक होण्यास तयार झाले होते.
पाटबंधारे खात्याने हा तलाव शेतकऱ्यांचा हक्काचा असून तो पूर्ण शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवला आहे, मात्र पाटबंधारे खात्याचे पत्र असल्याचे सांगण्यात आले होते पण ते पत्र सुद्धा हजर करण्यात न आल्याने नाराजी व्यक्त झाली.