घरच्या गरीब परिस्थितीत रात्रीच्या वेळी घरातील इतरांना त्रास होऊ नये म्हणून मोबाईल टॉर्च वरून अभ्यास करत बारावी सायन्स मध्ये 91.5 %टक्के गुण मिळवत यश संपादन केलंय चव्हाट गल्ली येथील या शिवराज भास्कर चव्हाण विद्यार्थ्याने…
भास्कर चव्हाण हे शेवंतीलाल शाह यांच्या इलेक्ट्रिक दुकानात कामाला जाऊन आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करतात त्यांचं स्वतःच घर नाही ते चव्हाट गल्लीत एका छोट्याश्या खोलीत भाड्याने रहातात त्यांचा मुलगा शिवराज यानें जी एस एस कॉलेज मधून पी यु सी द्वितीय परीक्षेत 91.5%टक्के गुण घेत गरिबी आणि संघर्षातून यश मिळवलं आहे.
त्याने अभ्यास करण्यासाठी रद्दीतून कमी किंमतीत सी इ टी ची पुस्तके घेतली होती इतकेच काय तर बारावीची पुस्तके लायब्ररीतुन घेऊन अभ्यासली होती. सध्या तो सी इ टी ची तयारी करत असून तो इंजिनिअर व्हाव किंवा सिव्हिल सर्व्हिस परीक्षा द्यावी अशी त्याने ध्येय बाळगले आहे.
केवळ इंग्लिश माध्यमातून शिकलेली मुलेच 90 टक्क्यांहून अधिक गुण घेत यश मिळवतात असे नसून शिवराज याने दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी विद्या निकेतन सारख्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून हे घवघवीत यश संपादन केलंय.
चव्हाट गल्ली सारख्या संवेदनशील भागात केवळ दगड मारणारी मुले असतात हा भ्रम दूर करत अत्यंत गरिबीतून त्याने हे यश मिळवलं आहे.या यशा बद्दल टीम बेळगाव live कडून त्याचे अभिनंदन…