Sunday, January 5, 2025

/

मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती-ग्राऊंड रिपोर्ट-3

 belgaum

निवडणूक आयोग आणि प्रशासन वेगवेगळी काळजी घेऊन मतदानाची आकडेवारी वाढवण्याचे प्रयत्न करत असताना बेळगाव लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे. बेळगाव live ne निवडणुकीसंदर्भात ग्राउंड रिपोर्ट पाहण्याचा प्रयत्न केला अनेक मतदारांशी बातचीत केली असता मतदानाची टक्केवारी कमी होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

देशाच्या वेगवेगळ्या भागात पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. मतदानाची आकडेवारी कमी झाली या भागात कशी परिस्थिती असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला यावेळी ती धक्कादायक माहिती मिळाली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुरेश अंगडी काँग्रेसचे डॉ व्हीएस साधूंनावर आणि इतर अपक्ष असे बहुसंख्य उमेदवार उभे राहिले आहेत. प्रत्येक उमेदवाराने आपला प्रचार सुरू केला असला तरी वेगळ्या कारणामुळे मतदार निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यताच जास्त आहे. यामधील पहिले कारण जोडून आलेल्या सुट्ट्यांचे आहे या सुट्ट्यांमुळे मतदार जास्तीत जास्त प्रमाणात सहलीला जाऊन मतदानादिवशी परत येतील की नाही याची शक्यता कमीच आहे, दुसरे कारण उमेदवाराबद्दल असलेली नाराजी आहे. अपक्ष उमेदवार डिपॉझिट जप्त होईल या आशेने निवडणुकीत उतरलेले आहेत. मात्र प्रबळ भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचे उमेदवार हे विजयी होण्याची इच्छा ठेऊन उतरले असले तरी उमेदवारांच्या निवडीवरून दोन्ही पक्षात असलेली नाराजी हे महत्त्वाचे कारण मतदान कमी होण्यासाठी लागू पडू शकते असा अंदाज आहे.

Congress_BJP_logo

हा अंदाज स्थानिक मतदारांशी संवाद साधल्यानंतर मिळाला आहे .भाजपचे समर्थक असलेले लोक मोदींना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत मात्र उमेदवार योग्य नसल्यामुळे मोदी सत्तेत सत्तेत येतीलच या उमेदवाराला मतदान केले नाही तरी काही फरक पडणार नाही असा त्यांचा अभिप्राय आहे. काँग्रेसच्या बाबतीत बरेच काँग्रेसचे नेते नाराज आहेत उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा आणि सधन असला तरी संपूर्ण मतदारसंघातील जनतेशी संपर्क नसल्यामुळे फक्त निवडणुकीपुरते दाखल झाल्यामुळे काँग्रेसच्या बद्दल हेच मत आहे. त्यामुळे मतदान करून आणि नोटा चा पर्याय अवलंबून मते बाद करण्यापेक्षा यानिमित्ताने कुठेतरी बाहेर जाऊन आनंद घ्यावा अशी चुकीची प्रवृत्ती मतदारांमध्ये पडत आहे .

निवडणूक आयोगाने वेगवेगळे उपाय अवलंबले आहेत स्थानिक खेळाडू आणि इतर व्यक्तींचा वापर करून मतदानाबद्दल रॅली व जागृती फेरी आयोजित केल्या जात आहेत. जास्तीत जास्त सुशिक्षित मतदारांनी निवडणुकीत सहभाग घ्यावा अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे .त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र वेगवेगळी कारणे लक्षात घेता बेळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी 60 टक्क्यांच्या पुढे जाईल अशी शक्यता कमी आहे .अशी परिस्थिती निर्माण झाल्यास निवडणुकीत त्याचा फटका बसणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.