Tuesday, January 7, 2025

/

बेळगावात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू काय बोलले?

 belgaum

भारताचे उपराष्ट्रपती महामहिम वेंकय्या नायडू यांनी बेळगाव मध्ये केलेले हे भाषण खास बेळगाव live च्या वाचकांसाठी देत आहोत.
के ले ई अभिमत विद्यापीठाच्या 9 व्या पदवीदान समारंभास उपस्थित राहताना मला अत्यानंद होत आहे. पदवी मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो.

डॉ प्रभाकर कोरे यांनी मला याठिकाणी बोलावले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. के ले ई सोसायटी आणि विद्यापीठाने केलेल्या कामांची आपल्याला कल्पना आहे. शिक्षण, आरोग्य आणि संशोधनाचे हे काम अनेक वर्षे सुरू आहे. मी या संस्थेला भेट देण्याच्या प्रतीक्षेत होतो आज ती संधी मिळाली आहे.

सात शिक्षकांनी ही संस्था सुरू केली. 100 वर्षांपूर्वी गरीब लोकांच्या मुलांना शिक्षण देण्याचा ध्यास समोर ठेवून हे काम सुरू झाले. चांगले शिक्षण देणे म्हणजेच समाजाचे सबलीकरण हे त्या दुरदृष्टिवादी शिक्षकांनी त्यावेळी ओळखले होते. स्वतःच्या मिळकती, जागा, जमिनी आणि घरे विकून त्यांनी हे काम सुरू केले.

Venkaiah naidu
के एल ई विद्यापीठ सुरुवातीपासूनच दर्जात्मक शिक्षण देण्यात पुढे आहे, आरोग्य शिक्षण आणि संशोधन हे काम सातत्याने सुरू आहे. खासगी क्षेत्रातील देशातील मोजक्या विद्यापीठात या विद्यापीठाने आपले नाव कमविले आहे. हॉस्पिटल ने तर आपल्या सेवांनी जगात नाव कमावले असून ही सारी किमया डॉ प्रभाकर कोरे यांनी केले आहे.
या सर्व कामाचा अभिमान देशाला वाटतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.