Monday, April 29, 2024

/

‘मराठीत’ जग जिंकण्याची ताकत म्हणून मातृभाषेत शिक्षण घ्या:पाटील

 belgaum

मातृ भाषेत शिक्षण घेणे म्हणजे इंग्रजी शिकू नका असे नाही कारण कोणतीही चळवळ करताना मातृ भाषेची मदत होते त्याचप्रमाणे जग जिंकण्याची ताकत मराठीत आहे. स्पेन,जर्मनी,रशिया हे इंग्रजी मुळे वर्चस्व करत नाहीत तर ते त्यांची भाषा जपल्यामुळेच तर मराठी शिकल्यामुळे नुकसान नाही,जे अधिकारी, संशोधक मातृभाशेत शिकले त्यांची उदाहरने जीवनात घ्या असे आवाहन युनिक अकादमीचे राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

मातृभाषेतील शिक्षण ही काळाची गरज या विषयावर राजकुमार दिलीप पाटील हे मार्गदर्शन करताना व्यक्त केले.महाराष्ट एकीकरण युवा समिती च्या वतीने रविवारी सांस्कृतिक कार्यक्रम आदर्श शाळा पुरस्कार आणि किल्ला स्पर्धाच बक्षीस संभारभ ओरिएन्टल हायस्कूल च्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते

गडकिल्ले आणि संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करताना दुर्गवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष श संतोष हासुरकर म्हणाले कागदाने मराठी बांधव कर्नाटकात तर मनाने महाराष्ट्रातच आहेत .1818 मध्ये ब्रिटिशांनी युद्धणीती वापरली ती मंदिरे म्हणजे किल्ले फोडुन उध्वस्त करून सत्ता स्थापन केली. किल्ले जपणे हीच काळाची गरज नवीन किल्ले बांधले जाऊ शकत नाही कारण लगेच कोसळतीलही व सरकार करतील ही अपेक्षा ठेऊन उपयोग नाही कारण ते तेथेच कोसळतील.हिंदुत्व टिकवायचे असेल तर गड किल्ले संवर्धन केले पाहिजे. किल्ले सांभाळणे म्हणजे किल्ल्यावर घाण न करणे ,किल्याचा अभ्यास करणे ,आपल्या आजूबाजुचा इतिहासाचा अभ्यास करणे,खरी संस्कृती ही बेळगावमध्येच जपली जाते. दुर्गवीर समितीच्या पाठिशी आहे असे सांगत सीमाप्रश्न सोडुनिकी साठी कटिबद्ध असल्याचे सांगितले .युवा समितीच्या वतीने दुर्गवीर प्रतिष्ठान यांना साधन सामुग्री भेट देण्यात आली.यावेळी दीपक दळवी,माजी आमदार अरविंद पाटील,नगरसेवक संजय शिंदे,अनंत देशपांडे आदी उपस्थित होते.

 belgaum

Yuva samiti

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य किल्ला स्पर्धा 2018

महा विजेता (सर्व विभाग मिळून)
रौद्रशंभू ग्रुप – सिंडिकेट बॅंक जवळ कंग्राळी B.K. (राजगड)

बेळगाव उत्तर विभाग
प्रथम क्रमांक- कट्टा ग्रुप शिवाजी नगर 2nd मेन (जंजीरा)

द्वितीय क्रमांक – श्री युवक मंडळ शाहू नगर (बहादूर गड)

द्वितीय विभागून- नक्षत्र कला ग्रुप रामनगर कंग्राळी K.H.
(सिंहगड)
तृतीय क्रमांक- शिवबा ग्रुप शिवाजी नगर 5वा क्रॉस (विजयदुर्ग)
तृतीय विभागून-धर्मवीर संभाजी युवक मंडळ ताशीलदार गल्ली (जंजिरा)

बेळगाव ग्रामीण विभाग
प्रथम क्रमांक- सिद्धार्थ मारुती चौगुले, मुचंडी (रायगड)

द्वितीय क्रमांक- वीर संभाजी आ. छा. होनिहाळ (पन्हाळगड)

तृतीय क्रमांक- छ. शिवाजी यु.मं. सुळगा हीं. (रायगड)

तृतीय विभागून- मराठा रियासत, निलजी (जंजिरा)

बेळगाव दक्षिण विभाग
प्रथम क्रमांक- शिवनेरी युवक मंडळ, रघुनाथ पेठ अनगोळ
(फर्मागुडी गोवा)
द्वितीय क्रमांक- बालशिवाजी यु.मं. नाथ पै नगर अनगोळ
(किल्ले तोरगल)
द्वितीय विभागून- शिवतलवार मित्र मंडळ लक्ष्मी नगर वडगाव
(किल्ले वेल्लोर)
तृतीय क्रमांक- शिवशंभू मीत्र मं. कलमेशवर नगर मजगाव
(भुवनगिरी)
तृतीय विभागून- शिवप्रतिष्ठान तरुण मंडळ, खादरवादी
(राजगड)

विशेष पुरस्कार
काजल सनदी, s.p.m. रोड (सिंधुदुर्ग)
करणं, वादळ ग्रुप, नेहरूनगर (सिंहगड)
महर्षी रोड टिळकवाडी लहान गट सिंहगड
संघर्ष मार्कन्डेय नगर कंग्राळी K.H. उत्कृष्ट माहिती
शिवतेज ग्रुप (मुली) निलजी (रांगणा)
कलमेश्वर यु.मं. बसवण कुडची (तोरणा)
शिवशक्ती यु.मं. अळवन गल्ली (धरुड)
रयत गल्ली (विजयदुर्ग)
टेंगीणकेरी गल्ली (नळदुर्ग)
छ. शिवाजी व्यायामशाळा कंग्राळ गल्ली (पद्मदुर्ग)

यावेळी 2018-19 सालाचा आदर्श शाळा पुरस्कार वितरित करण्यात आला. इंग्रजी शिक्षणाकडे सर्वांची ओढ असून देखील पुरस्कार प्राप्त शाळांनी आधुनिक शिक्षण पद्धती अवलंबत मातृभाषेतून शिक्षण देता देता वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत, या शाळा सरकारी असून देखील विद्यार्थ्यांची पटसंख्या उल्लेखनीय आहे. आणि दर्जेदार शिक्षणातून या शाळा आपला वेगळा ठसा उमटवत आहेत म्हणून युवा समिती त्यांच्या कार्याची दखल घेऊन आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरव केला
हे पुरस्कार बेळगाव मधील 5 मतदारसंघ निहाय वितरित करण्यात आले.

बेळगाव उत्तर- कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळा, कॅम्प

बेळगाव ग्रामीण- सरकारी प्राथमिक मराठी शाळा, निलजी ता.जि.बेळगाव

बेळगाव दक्षिण- गव्ह.मॉडेल शाळा येळ्ळूर, ता.जि. बेळगाव
आणि
सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडी, येळ्ळूर, ता.जि. बेळगाव(या विभागात दोन शाळांची निवड करण्यात आली आहे)

खानापूर- सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा जांबोटी, ता. खानापूर जि. बेळगाव

यमकनमर्डी- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा मुचंडी, ता. जि.बेळगाव
या वेळी युवा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते समिती नेते, सर्व पुरस्कार विजेते, समितीप्रेमी नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.