belgaum

कामत गल्ली घटनेत दोन फिर्यादी दाखल

0
pak-z
 belgaum

भारत विरोधी घोषणा दिल्या प्रकरणी कामत गल्ली येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकारात घोषणा दिल्याचा आरोप करून घोषणा देणाऱ्यांना जमावाने चोप दिला होता.

पोलिसांनी हस्तक्षेप करून तणाव निवळला नंतर आता जखमी तरुणांवर उपचार सुरू असून दोन एफआयआर दाखल झाले आहेत.
सहेप पटेल याने आपल्याला मारहाण झाल्याबद्दल फिर्याद दिली आहे. तर मल्लारी बिडीकर ( कामत गल्ली) याने पाच जणांनी देशविरोधी घोषणा दिले अशी फिर्याद दिली आहे.

कोणत्या परिस्थितीत शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस दल सतर्क आहे. देश विरोधी घोषणा देण्याचा प्रकार चुकीचा आहे अशा घटना घडू नयेत याची काळजी पोलीस घेत आहेत.

 belgaum

दरम्यान या प्रकारच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा कायदा हातात घेऊ नका असे असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.