येळ्ळूर गावातील मंगाई तलावात फार वर्षांपासून गाळ साचला होता. या तलावाकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता तसेच गाळ साचून पाणी शिल्लक राहात नव्हते. या परिसरातील नागरिकांनी निवेदन देऊन या तलावातील गाळ काढावा अशी विनंती केली होती.
याची दक्षता घेऊन जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी या कामासाठी तीन लाख रुपये मंजूर केले.
तलावाची खुदाई करून पाणी अडवण्यात येणार आहे, हे काम सुरू करण्यात आले आहे. येथे पाणी साचून आता आजू बाजूची जमीन ओलिताखाली येऊ शकणार आहे. विहिरी व तलावांचे पाणी वाढणार असून शेतकऱ्यांची पाण्याची समस्या सुटणार आहे.