Friday, May 3, 2024

/

आचारसंहिता लागल्यावर बरीच कामे होणार बंद

 belgaum

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आज सायंकाळी पाच-साडेपाचच्या दरम्यान निवडणूक आयोग आचारसंहिता जारी करणार असल्याची माहिती मिळत आहे. ही आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विकास प्रकल्पाचे उद्घाटन तसेच घोषणा बंद होणार आहेत.

सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार म्हणून लवकरात लवकर वेगवेगळ्या विकास कामांचे उद्घाटन ए उरकून घेण्यात येत होती अजून काही उद्घाटन करण्याची लोकप्रतिनिधींची इच्छा होती, मात्र सायंकाळी 5 नंतर ही सारी कामे बंद होऊ शकणार आहेत.

लोकप्रतिनिधींना सरकारी वाहनातून फिरणे तसेच सरकारी वाहनांवर असलेले पक्षांचे किंवा व्यक्तिगत फलक आता झाकावे लागणार आहेत. कोणत्या बाबतीत सरकारी स्तरावर एखाद्या पक्षाची जाहिरात केली जाऊ नये याची दखल आचारसंहितेत अधिकारीवर्गाला घ्यावी लागणार आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीने आपण हे काम केले असल्याचे सांगून उद्घाटन करण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत .आचारसंहितेत राजकीय पक्षांना आणि निवडणुकीला उभे करणाऱ्या उमेदवारांबरोबरच त्यांचा प्रचार करणाऱ्यांवर एक संहिता निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहे.

 belgaum

Election commission त्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची राहणार आहे आजपर्यंत जे काही झाले ते आचारसंहितेच्या काळात करता येणार नाही ,त्यामुळे कामाचे उद्घाटन मे नंतर होणार असल्याचे दिसून येत आहे.
आचारसंहितेचा कालावधीत या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कायम राहतो, त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आता कोणत्या गोष्टीचा श्रेयवाद लोकप्रतिनिधींना करता येणार नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.