सिद्धरामय्या यांच्या भूमिकेमुळे कर्नाटकात काँग्रेस पक्षाचे पतन होत असून त्यांनी कर्नाटकातील दलित ओबीसी आणि मुस्लिम पक्षात समान हक्क दिले नाहीत असा आरोप के पी सी सी सदस्य शंकर मूनवळळी यांनी केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित कर्नाटकातून निवडणूक लढवण्यासाठी 9 मार्च रोजी भारिप चे अध्यक्ष दलीत नेते प्रकाश आंबेडकर बेळगावला येणार आहेत संकम हॉटेल मध्ये दलित मुस्लिम आणि ओ बी सी समाजातील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे त्यातून कर्नाटकात वंचीत आघाडी किती जागांवर निवडणूक लढवेल त्या बाबत भूमिका ठरवली जाणार असे ते म्हणाले.
काँग्रेस आणि भाजपने दलित मुस्लिम आणि ओ बी सी समाजावर केलेल्या अन्याया बाबत बेळगावातील सभेत चर्चा होणार आहे.एम आय एम चे ओवेसी आणि भारिप प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात कर्नाटकात देखील वंचित आघाडी काढली जाईल असंही त्यांनी नमूद केलं.
जे डी एस काँग्रेस सरकारने कार्यकर्त्यांना निगम मंडळ अध्यक्ष पदे देण्या ऐवजी आमदारांना दिली आहेत सिद्धरामय्या यांनी सरकार पाडवण्याचा प्रयत्न केलेल्या रमेश जारकीहोळी यांना पक्षातून का हकालपट्टी केली नाही असा प्रश्न देखील मूनवळळी यांनी उपस्थित केला.यावेळी माजी नगरसेवक एम आय एम जिल्हाध्यक्ष लतीफखान पठाण,वकील मंगेश मानगुळ यांच्या सह दलित मुस्लिम नेते उपस्थित होते.