दरवर्षी प्रमाणे कणबर्गी गावचे आराध्य दैवत सिद्धेश्वर मंदिरात शिव रात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून सजवलेल्या गाड्यात सिद्धेश्वर देवाची मिरवणूक काढली जाणार आहे सोमवारी दुपारी 1 ते 6 या वेळेत सजवलेला गाडा मंदिरात पोचणार असून रात्री 12 ते 5 या वेळेत अभिषेक केला जाणार आहे.मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत महा प्रसादाचे आयोजन केले आहे.
बेळगाव पासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कणबर्गी येथील डोंगरावर जागृत सिद्धेश्वर मंदिर आहे.मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर असून तेथे सुशोभीकरण करण्यात येत आहे.पन्नास पायऱ्या चढून वर गेले की सिद्धेश्वराचे दर्शन होते.