belgaum

मटका अड्ड्यावर धाड; दोघांना अटक –

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
मटका अड्ड्यावर धाड

दि. २८ मार्च २०२६ रोजी मार्केट पोलीस ठाणे बेळगाव च्या पथकाने जुन्या भाजी मार्केट परिसरात मटका जुगारावर धाड टाकली. या कारवाईत
• संजू सुभाष पाटील (वय ४२, रा. फुलबाग गल्ली, बेळगाव)
• यमनप्पा शिवबसप्पा कुरबर (वय ४०, रा. बैलवाड, ता. बैलहोंगल)
या दोघांना अटक करण्यात आली.

हे दोघे “मेन रतन मुंबई” या मटका प्रकारावर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून पैसे घेऊन जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर व त्यांच्या पथकाने छापा टाकला. आरोपींकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
चौकशीत या दोघांनी जमा झालेली रक्कम
गजानन शशिकांत गरडे (रा. खंजर गल्ली, बेळगाव) याला देत असल्याचे सांगितले. या तिघांविरुद्ध गुन्हा क्रमांक ६२/२०२६, कलम ७८(iii) के.पी. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यावर कारवाई
त्याच दिवशी उद्यमबाग पोलीस ठाणे बेळगाव हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली.
• किरण चंद्रकांत शिरोळकर (वय ४०, रा. साईनाथ गल्ली, मंडोळी, बेळगाव)
हा इसम उद्यमबाग येथील पाय बेकरी परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करताना आढळला. पोलीस उपनिरीक्षक पी. जी. गंडवगोळ व त्यांच्या पथकाने कारवाई करून रॉयल चॅलेंज दारूची रिकामी बाटली व प्लास्टिक ग्लास जप्त केला.
त्याच्यावर गुन्हा क्रमांक २९/२०२६, कलम १५(A), ३२(३) आबकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे कौतुक
या दोन्ही कारवायांमध्ये आरोपींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.