Tuesday, April 30, 2024

/

कामत गल्लीत पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्याना चोप

 belgaum
जिल्ह्यातील रामदुर्ग येथे फेसबुकवरील पाकिस्तान जिंदाबाद प्रकरणाचे पडसाद  उमटत असतानाच आज   बेळगाव शहरातील कामत गल्लीत चौघा तरुणांनी केलेल्या आगळीकीमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता .रामदुर्ग येथे मोहम्मद शफी बनने याने सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबाच्या घोषणा दिली होती त्यामुळे वातावरण तापले होते.
रविवारी दुपारी चौघा तरुणांनी साडेतीनच्या सुमारास कामत गल्लीत फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे संतप्त जमावाने तरुणांचा पाठलाग करुन दोघांना दोरीने बांधून घालून बेदम चोप दिला आला. तर दोघेजण फरारी झाले. त्यानंतर दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी मार्केट पोलीस अधिक तपास करत आहेत.
pak-z
पुलवामा हल्लानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना काहीजण सोशल मिडीयाव्दारे पाकिस्तानचा जयजयकार करत आहेत. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. रामदुर्ग येथील एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या फेसबुकवर पाकिस्तानची घोषणा शेअर करण्यात आल्याने या प्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेनंतर बेळगावात देखील अशीच घटना घडली आहे. शहरातील कामत गल्ली अचानक चौघे तरुण आले. त्यांनी फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त जवावाने त्यांचा पाठलाग केला.
दोघांना पकडण्यात नागरिकांना यश आले तर दोघेजण पसार झाले. संशयिताना दोरीने बांधून घालून जमावाने बेदम चोप दिला. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाला होते. दरम्यान दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होत.
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.