अंजलीताई निंबाळकर विवेकराव पाटील यांना उमेदवारी दिल्यास काय गणिते होतील यावर पक्ष गंभीरपणे विचार करत आहे. जर का पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास सर्वजण काम करतील असा विश्वास आहे असे मत वन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.मंगळवारी काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकी नंतर माध्यमानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
साधूंनावर,शिवकांत सिदनाळ हे देखील रेस मध्ये आहेत उमेदवारी कुणालाही मिळुदेत आम्ही पक्षाचा बेस तयार करत आहोत बेळगावच्या उमेदवारी बाबत कोणताच गोंधळ नाही गेल्या वेळी देखील चौघे जण इच्छुक होते त्यातून लक्ष्मी हेब्बाळकर यांना उमेदवारी दिली त्यांच्या साठी जसे काम केलं यावेळी इतरांसाठी करू असे देखील जारकीहोळी म्हणाले.
आपल्या भाऊ चननराज यांच्या साठी लक्ष्मी हेब्बाळकर दिल्लीत मोठी लॉबिंग करत आहेत त्यामुळे स्थानिक वरिष्ठ काँग्रेस नेते नाराज नाहीत काय?यावर बोलताना पक्ष यावर अंतिम निर्णय घेईल मात्र उमेदवारी देण्या अगोदर स्थानिक नेत्यांशी चर्चा केली तर बरं होईल असे म्हटले तुम्हाला लक्ष्मी यांनी संपर्क केलाय का यावर बोलताना त्यांनी कुणीही मला संपर्क केला नसल्याचे स्पष्ट केले मात्र कुणालाही उमेदवारी मिळाल्यास आम्ही काम करायला कटिबद्ध आहोत पक्ष संघटना मजबूत करण्यावर आमचा भर आहे.
काँग्रेसच्या राज्यातील उमेदवारी बाबत पहिल्या टप्प्यातील चर्चा झाली आहे या नंतर दिल्लीत देखील यावर चर्चा होईल.तिकीट वाटप एकीकडे तर दुसरीकडे पक्ष संघटना मजबुती देण्यावरविविध कार्यक्रमाच्या आयोजना द्वारे भर दिला जात आहे असेही त्यांनी नमूद केलं.
उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न नाही :अंजलीताई
मीडिया आणि वर्तमानपत्रातुन खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांना बेळगाव लोकसभा मतदार संघातून काँग्रेस उमेदवार म्हणून नाव पुढे येत असले तरी स्वतः अंजलीताई यांनी याचा इन्कार केला आहे.मंगळवारी काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकी नंतर माध्यमानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील इन्कार केलाय.
सध्या मीडियातून माझं नाव येत असेल तरी मी स्वतः होऊन उमेदवारी साठी प्रयत्न करत नाही. उमेदवारीबाबत हाय कमांड निर्णय घेणार असून जो कोण उमेदवार असेल त्यांच्यासाठी काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.तुम्हाला अधिकृत उमेदवारी दिली तर तुम्ही काय करणार यावर बोलताना त्या म्हणाल्या ते हाय कमांड वर निर्भर असेल मी सध्या खानापूरची आमदार आहे जर तर च्या गोष्टींवर राजकारण होत नाही वरिष्ठ कार्यकर्ते नेते आणि खानापूरची जनता यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल.
लहान मोठे पक्षविरोधी सेठ यांना पक्षात नको आहेत
पक्ष विरोधी कामगिरी केलेल्याना पक्षातून काढून टाका अशी मागणी उत्तरचे माजी आमदार फिरोज सेठ यांनी केली आहे. मुंबईत जाऊन पक्ष विरोधी कारवाई केलेल्याना पक्षातून काढून टाका असे म्हणत त्यांनी बैठकीत बंडखोरां विरोधात रोष व्यक्त केला.
रायबाग बेळगाव उत्तर बेळगावं दक्षिण आणि कुडची मतदार संघात विधान सभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विरोधी काम केल्याने पराभव झाला असल्याचे त्यांनी नमूद केलं.पक्ष विरोधी काम केलेल्या लहान मोठ्या चोरांना बाहेरचा रस्ता दाखवा अस देखील त्यांनी नमूद केलं.
काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यानी नेत्यांच्या कानपिचक्या करत केवळ निवडणूक आली की नेत्यांना काँग्रेस पक्षाची आठवण येते असे सुनावले. वन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या समोर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.बैठकीत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार रमेश जारकीहोळी अनुपस्थित होते.