Friday, September 13, 2024

/

असाही पक्षीप्रेमी…

 belgaum

२० मार्च हा दिवस आज जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या चिमण्यांची संख्या झपाट्यानं घटत आहे. प्रत्येकाच्या लहानपणीच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असेलल्या चिमण्यांचं संवर्धन व्हावं या करता जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या संचालक भाऊ किल्लेकर यांच्या टेरेस वर चिमण्या आणि इतर पक्षांना या रखरखत्या उन्हात पाणी आणि धान्य मिळावे म्हणून खास बांधकाम करून अभिनव उपक्रम राबवला आहे.

बेळगावात चिमण्यांची देखभाल करत त्यांना दाणा पाणी देणारे अनेकजण आहेत त्यात सध्याच्या उन्हात सामान्य माणसाला अनेकदा तहान लागत आहे त्यात पक्षांची हालत काय असणार याचा विचार करून त्यांनी हे काम केलंय

Chimani

जागतिक चिमणी दिनानिमित्त उन्हाळ्यात चिमण्यांसाठी खिडकीत, बागेत, शेतात पाण्यानी भरलेली भांडी ठेवण्याविषयी आव्हान केलं जात आहे, अनेकवेळा कडक उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने चिमण्याचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो यासाठी जायंट्स मेनचे पदाधिकारी, सदस्य नेहमीच आवाहन करत असतात.त्याची सुरवात स्वतःपासून करावी या उद्देशाने भाऊ किल्लेकर यांनी पुढाकार घेऊन जायंट्स ची संकल्पना सत्यात उतरवली.

प्रत्येकांनी आपापल्या घरी, टेरेसवर अशा प्रकारची व्यवस्था करून चिमणी पाखरांची घटत चाललेली संख्या वाढवण्यास मदत करावी असे आवाहन जायंट्स मेनचे सदस्य भाऊ किल्लेकर यांनी केले आहे.सर्व स्तरातून भाऊ किल्लेकर यांचे कौतुक होत आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.