Friday, December 27, 2024

/

आपले जीवन पुनर्रुजीवित करा !!! – आपले भविष्य तयार करण्यासाठी मूल्य तयार करा…

 belgaum

A for Apple, B for Ball- अगदी आत्मविश्वासपूर्ण बरोबर? या वयात हे खूपच सोपे आहे, पण तुम्ही जेंव्हा ३ ते ४ वर्षाचे होता तेव्हा तुम्हाला सतत सुधारणा कराव्या लागतात, स्मरणात ठेवावे लागते. हा उपक्रम तुम्ही Z for Zebra माहित होईपर्यंत राबवावा लागतो. तुम्ही परिपूर्ण होईपर्यंत सतत उजळणी करावी लागते. हे चित्र पाहता A to Z हा परिपाठ पूर्ण करण्यासाठी आपल्या बालपणी कुठून सुरवात करावी हे आम्हास कुठे माहित होते. यातून आपल्या लक्ष्याची दिशा कोणती आहे याबाबत तुम्हास स्पष्टता आलेली असते. तुम्ही जेव्हा अडखळता तेव्हा पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करता किंवा पालक वा शिक्षकांची पुढे जाण्यास मदत घेता. पण तुम्ही हा उपक्रम कधीच अर्धवट सोडत नाही कारण हे आपण उत्तम पद्धतीने संपवणार हे तुम्हास समजलेले असते. आपल आयुष्य देखील A पासून Z पर्यंतचा परिपाठ संपवण्याचा एक उपक्रम आहे व तो आराखडा बालवाडीनंतरही सामोरा येतो.

हळू हळू आपणास पडणाऱ्या प्रश्नांची कमीत कमी उत्तरे मिळत तुम्ही वाढत जाता. जेव्हा तुम्हाला मूलभूत तत्वे समजतात किंवा तुम्ही पुर्नरावृती करीत धडे शिकत जाता तेव्हाच तुम्हास उत्तरे पूर्णतः समजतात. तुमच्या जीवनाचा प्रवास बऱ्याच आधी A पासून सुरुवात झाली आहे, आता तुम्ही कुठल्या मुळाक्षरांपर्यंत पोहचला आहात हे तुम्हास माहीत नाही आणि जीवनातील अखेरचे अक्षर Z केव्हा जवळ येणार याचीही कल्पना नाही. काही धड्यांचा अनुभव घेणे आपल्यासाठी महत्वाचे होते कारण त्यातून तुम्ही समस्याना सामोरे जाऊ शकता. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही अडचणींशी संघर्ष करू शकता.

मोकळेपणी म्हणायचे तर आयुष्याचा प्रवास आपणास नीटपणे समजला नाही तर दिशाहीन होऊन रस्ता चुकण्याची भीती असते. लोकांना याचे विस्मरण होते कि गती किंचित मंदावली थोडी दिशा बदलली तरी प्रवास हा पुढच्याच दिशेने व्हावयास हवा. जसे एखादे मुल एकाच मुळाक्षरावर अडकून बसावे, पुन्हा पुन्हा तेच घोळत राहवे किंवा त्याने पुढचे मुळाक्षर काहींशी आढेवेढानंतर चुकीचे उच्चरावे असे पुष्कळदा जीवनात घडते. हे ध्यानी राहावे की जीवन प्रवास हा जर आपण लोकांची मते जाणून त्यांच्या संकल्पनांचे स्वागत करून दुरुस्त केला किंवा नव्याने पुन्हा सुरु केला तर अधिक चांगला होतो. पालकांच्या किंवा शिक्षकांच्या केवळ एखाद्याच सूचनेने मूल मुळाक्षरे अधिक वेगाने उच्चारू लागते पण आपण बहुतेकदा कुठल्याही प्रसंगात केवळ नकारात्मक बाजू तितकीच पाहतो. अश्यावेळी प्रसंग शांत चित्ताने समजून घेण्याची आणि आपली मनोधारणा बदलण्याची गरज असते.
आपण हे समजून घेणे गरजेचे आहे की आपण जर उत्तम मूल्यांचा मार्ग निवडला आणि त्यानुसार आपले अंतर्मन तयार केले तर आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. मूल्यांचे जर थोडक्यात वर्णन करायचे तर “पैशाने खरेदी न करता येणारी गोष्ट” असे करता येईल. याकडे पाहण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे उदाहरनार्थ आज प्रचलित असलेला सोशल मीडिया एखाद्याची Facebook प्रतिमा कशावरून बनते? ती कशी दिसते? दोन परस्पर विरोधी विचारसरणीच्या Facebook वर कोणता फरक जाणवतो? ज्या लोकांना तुम्ही “LIKE” किंवा “FOLLOW” करता त्यातून तुम्हाला काय वाटते, तुम्ही काय शिकता, तुम्हाला काय उत्तेजन आणि प्रेरणा मिळते, तुम्ही अधिक काळजीवाटू बनता, चांगली मूल्ये मिळतात, सकारात्मक विचार करू शकता, देशभक्त बनता, किंवा निरुत्साही, भित्रे, वाईट सवयींना बळी पडणारे, वाईट मूल्ये बाळगणारे, देशद्रोही, नैराश्यग्रस्थ आणि आयुष्याकडे पाहण्याच्या नकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे असा चांगला व वाईट फरक तुमच्या व्यक्तिमत्वात पडतो. आपण ह्या बाबीकडे बारकाईने लक्ष देऊन आपल्या आवडी निवडी कशी आहे याचा पडताळा घेतला पाहिजे. Online असो वा Offline आपले व्यक्तिमत्व आदरणीय बनले पाहिजे.
मुलांमधील मूल्ये अगदी कोवळ्यावयातच बानू लागतात. पालक व समाजाची त्यात महत्वपूर्ण भूमिका असते. एकदा मेंदूतील विचारसरणी तयार झाली तर त्याप्रमाणे पुढे आयुष्यभर तुम्हास इशारे व निर्देश मिळत जातात. ते बदलणे फारसे सोपे नसते आणि या प्रक्रियेवरच तुम्ही जे यशापयश मिळवता ते अवलंबुन असते.

तुमचे जीवन पूर्णतः बदलण्यासाठी खालील (मुद्याचे) आचरण सुरु करा:
• उत्तम मूल्यपद्धत्ती विकसित करा (प्रेम, आदर, चरित्र, मदत, भाव, काळजी वहाने, इत्यादी).
• शिकण्याची आणि ऐकण्याची प्रवृत्ती वाढवा.
• ग्रंथ किंवा पुस्तके वाचण्याची सवय ठेवा.
• ध्यान धारणेचा सराव करा (आत्मविश्वास व निवांतपणा मिळवण्यासाठी).
• तुमची सकारात्मकता वाढवण्यास व तुम्हास समजून घेणारे मित्र करा.
• प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा पाठपुरावा करा.
• सकारात्मक विचार व विश्वास आपल्या ठायी निर्माण करा.
• तुमचे संपर्क कौशल्य वाढवा.
• तुम्ही विद्वान आहात असे समजा.
• एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्या.
• तुम्ही समाजासाठी काय करीत आहात याची नोंद ठेवा. तुम्ही समाजाचे तरुण सदस्ये आहात, त्यामुळे समाज सुदारण्याची व चांगला राखण्याची अधिक जवाबदारी घ्यावयास हवी.
आपणास हवा असेल तर थोडा वेळ घ्या आणि योजनाबद्धपणे आरंभ करा कारण “रोम देश देखील एका दिवसात बांधले गेले नाही” (ही म्हण ऐकलाच असाल) पण कालच्यापेक्षा आज सुधारण्याचा निरंतर प्रयत्न सुरु राखा.

आता तुम्ही विचार कराल कि कुठून सुरुवात करावी, कोण आणि कशे याकामी मदत करेल?? तुमच्या जीवनात अनेक तुमचे जवळचे लोक आहेत ज्यांना तुमचा विकास हवा आहे, असे लोक तुम्हास योग्य मार्गदर्शन करतील. पण असे होण्यासाठी तुम्ही स्वतः आधी पुढाकार घेतला पाहिजे मगच ते तुम्हास पुढे घेऊन जातील. काही वेळा तुम्ही तुमच्या पालक/शिक्षक/पालनकर्ता/प्रशिक्षक यांच्यावर अवलंबुन रहाता. तुम्हास वाटते कि त्यांनी तुमच्याकडे यावे, तुम्हास मार्गदर्शन करावे मग तुम्ही त्या कामाला सुरुवात करावी, पण ही प्रवृत्ती तुम्हास आयुष्यात कधीच मदत करणार नाही, तुमचा विकासही होणार नाही. हा तुमचा प्रवास आहे, तुमची योजना आहे, तुमचे जीवन आहे म्हणून पुढाकार घेऊन आरंभ केले पाहिजे, तुमच्यासाठी अनेक सुंदर आश्चर्य उलगडतील.
या जीवन प्रवासात चढ-उतारही येतील, त्यामुळे नाउमेद होऊ नका. अपयशामुळे नाराज होऊ नका. अपयश हा वाईट अनुभव आहे आणि वाईट अनुभव यश मिळवण्यास हातभार लावतात. नकार व अपयश जर सुज्ञपणे हाताळले तर ते तात्कालिक आहेत हे समजून येईल. जो बदल तुम्हास हवा आहे त्यासाठी क्रियाशील व्हा, गोष्टी आपल्यापणच बदलू लागतील.
आपणास जशी व्यक्ती बनावे असे विचारांनी वाटते, तसे आपण बनता. म्हणून विचार करा आणि विश्वास ठेवा कि, जीवनाचा पूर्णशोध घेण्याची पात्रता तुमच्यात आहेत. आयुष्यातील कोणत्याही प्रसंगी तुम्ही पूर्णउभारी घेऊ शकता.
जेव्हा तुम्ही प्रयत्न करण्याचे सोडून देता, तेव्हा तुम्ही हरता. A पासून Z पर्यंतचा तुमचा प्रवास ठरलेला आहे, तुमची आवश्यक दिशा व गती समजून घ्या. यशस्वी लोकांना देखील चांगले व वाईट दिवस पाहावे लागतात, पण समाजाशी संभंदीत भावना, प्रसंग, वर्तणूक अश्यावेळी हाताळण्याची त्यांची क्षमता त्यांना “विजयी बनवते.”

तेजस कोळेकर (पर्सनल कोच, शिक्षक)
संस्थापक, संस्कृती एडुकेअर (www.sanskrutieducare.com)
(M) – 9916835550

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.