खानापूर येथील महालक्ष्मीच्या यात्रेत तब्बल सहा टन भंडाऱ्याची उधळण झाली. भंडाऱ्यात चॉक पावडरची भेसळ झाल्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसला आहे. यात्रा कमिटीने विनंती करून भंडाऱ्याची अजिबात उधळण करू नका अशी सूचना केली होती. मात्र ऐनवेळी रथोत्सव सुरू असताना भंडारा बाहेर पडला आणि त्याची उधळण झाल्यामुळे नागरिकांना इन्फेक्शनचा त्रास होऊ लागला आहे याबद्दल यात्रा कमिटीने दिलगिरी व्यक्त केली असून यापुढे कोणीही भंडारा उधळू नये. उधळण करायची असल्यास फुले उधळावीत अशी विनंती खानापूर महालक्ष्मी यात्रा कमिटीने केली आहे .
यात्रा कमिटीचे सेक्रेटरी यशवंत बिर्जे यांनी ही माहिती दिली. भंडाऱ्याची उधळण झाल्यामुळे वेगळ्या प्रकारचे त्रास होतात त्यामुळे त्रास टाळण्यासाठी यात्रा कमिटी ने खबरदारी घेतली होती मात्र अनेकांनी भंडाऱ्याची उधळण केली भंडारा खरेदी करताना तो चांगल्या प्रतीचा आहे की नाही याची काळजी घेण्यात आली नाही त्यामुळे चॉक पावडर असलेला भंडारा उधळला गेला. नाकातोंडात जाऊन अनेकांना इन्फेक्शन झाले आहे .
महालक्ष्मी यात्रेत हेलिकॉप्टर आल्यामुळे समस्त खानापूरकरांची मान अभिमानाने उंचावली गेली असली तरी भंडारा हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या वाऱ्यामुळे सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे त्याचा फटका काही प्रमाणात बसला असून यापुढील काळात काळजी घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.