बारा वर्षानंतर खानापूर महालक्ष्मी यात्रा ची सुरुवात उद्या बुधवार पासून होणार आहे. तयारीला शेवटचा दिवस मिळाल्यामुळे दुकानाची डागडुजी शेवटच्या टप्प्याला आली आहे.
बुधवारी महालक्ष्मीचे आगमन होणार आहे.खानापूर शहराची महालक्ष्मी देवीचे जे महात्म आहे म्हणजे ही देवी संपूर्ण भारतामध्ये नावाजलेली आहे.’अशी सुंदर मूर्ती आजवर पाहायला मिळाले नाही आणि अशी मूर्ती पाहिल्याचे भाग्य मला मिळाले आहे असे उदगार तत्कालीन जिल्हाधिकारी शालिनी रजनीश यांनी काढले होते ज्यावेळी त्यांनी खानापूरला भेट दिली होती त्यावेळी त्यानी असं म्हटलं होतं.
यात्रोत्सव काळात स्फूर्ती आणि आज यात्रा कमिटी न घेतलेला जुन्या कमिटीचा आदर्श समोर ठेवून आधुनिक पद्धतीला शोभेल अशा पद्धतीचे नियोजन उत्कृष्टरित्या केलेला आहे. त्यामुळे सर्व जण नागरिक त्यांची वाहवा करत आहेत.
अतिशय शिस्तबद्ध नियोजन पद्धतीने योजना पेपर द्वारे जाहीर केलेली आहे त्यामुळे जरा व्यवस्थित यशस्वीरीत्या सर्व नागरिकांना दर्शन लक्ष्मी यात्रेचा आनंद लुटण्यासाठी मोकळ्या वातावरणात त्रास न होता दर्शन व्हावे अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
संपूर्ण खानापूरकर जनता येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आतुरलेले आहेत .संपूर्ण गावातील रस्त्यांच्या दुतर्फा रोषणाई करण्यात आली आहे त्याचप्रकारे गावातील सर्व मंदिरांना रंगरंगोटी तसेच रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परगावातून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था यात्रा कमिटी द्वारे करण्यात आली आहे.
सदर यात्रेला उद्या बुधवार पासून सुरुवात होणार असून ही यात्रा 20 फेब्रुवारी 2019 पासून 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत हा उत्सव चालणार आहे तरी देवीच्या भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा व अत्यंत शिस्तबद्धरीत्या न भूतो न भविष्यती अशी ही यात्रा अजरामर करावयाची आहे.
खानापूर महालक्ष्मी यात्रेनिमित्त खानापूरच्या शाळा कॉलेजना 20 आणि 28 असे दोन दिवस सुट्टी असणार आहे तर 21 ते 27 पर्यंत सकाळी 8.00 ते दुपारी 2.00 या वेळेत शाळा भरणार. तर रविवार 3 मार्च व 10 मार्च हे 2 दिवस शाळा कॉलेज सुरु राहणार आहेत. यात्रा काळात खानापूर शहर हद्दीतील सर्व दारू दुकान बंद राहणार आहेत.