31 डिसेंम्बरच्या सकाळी अलारवाड क्रॉस जवळ तीक्ष्ण हत्त्याराने डोक्यावर वार करून खून केलेल्या त्या युवकाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.सदर युवक हलगा येथील असून उमेश अप्पय्या कुंडेकर वय 42 रा.गणपत गल्ली हलगा असे त्याचे नाव आहे.
सोमवारी सकाळी अलारवाड क्रॉस जवळ एका शेतात त्याचा मृतदेह आढळला होता त्या नंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता व तो युवक वडगांव किंवा आसपासच्या परिसरातील युवकाचा असावा,मद्य प्राशन करण्यासाठी शेतवडीत बसल्यानंतर आपापसातील वादानंतर हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता त्या दृष्टीने पोलिस तपास देखील चालू आहे.
उमेश हा आपल्या आई वडील भावा सोबत हलगा येथे रहात होता रविवारी रात्री पासून तो गायब होता तो त्या शेतात कसा गेला त्याच्या बरोबर पार्टी करायला आणखी कोण गेले होते का ?त्याचा खून दुसरी कडे करून त्याला तिथं टाकण्यात आले का?याचा तपास पोलीस करत आहेत.