३१ डिसेंबरची रात्र म्हणजे दारू पिऊन गोंधळ घालणे सुरू असते. काहीजण शिवकालीन गडही सोडत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून येळ्ळूर जवळच्या राजहंस गडावरही ३१ डिसेंबरला पार्ट्या झाल्याचे निदर्शनास आले आहे. असे होऊ नये आणि शिवाजी महाराजांच्या गडाचे पावित्र्य राखले जावे म्हणून श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेने आदर्श काम केले आहे. संपूर्ण रात्रभर गडावर पहारा ठेऊन सकाळी मंदिर व इतर भागाची स्वच्छताही करण्यात आली.
संघटनेचे प्रमुख रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम सेनेचे सर्व कार्यकर्ते गडावर हजर होते. ज्यांच्या पुण्याईने आज आपण जिवंत आहोत त्यांच्या गडावर काहीसुद्धा चुकीचे घडू नव्हे ही काळजी घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.
सगळीकडे पार्ट्या सुरू असताना हे २०० जण गड राखत होते. पार्टी करणाऱ्या भारतीय ब्रिटिशांपासून गड सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करून एक वेगळा आदर्श घालून देण्यात आला.
१ जानेवारीच्या सकाळ पर्यंत हे कार्यकर्ते गडावर होते. हिंदूंचे नवीन वर्ष गुढी पाडव्याला सुरू होत असते तेंव्हा नवीन वर्षाच्या उत्सव करा असा संदेश देण्यात आला आहे.