जात धर्म आणि इतर सगळे भेद न पाळता छत्रपती शिवराय आणि इतर राष्ट्रपुरुषांच्या मूर्ती रिक्षात ठेवून रिक्षा लक्झरी कारप्रमाणे सजवलेले एक रिक्षाचालक बेळगावमध्ये आहेत. त्यांच्या या रिक्षाला कोल्हापूर येथे झालेल्या सुंदर रिक्षा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला आहे.
धर्माने मुस्लिम असलेल्या या रिक्षाचालकाची विचारपूस बेळगाव live ने केली आणि त्याचे शिवराय प्रेम बघायला मिळाले.मोहंमदअकबर मोहंमदरसूल शेख (वय 62 रा.रघुनाथ पेठ अनगोळ) हे त्या रिक्षाचालकाचे नाव. के एस आर टी सी मध्ये ते ड्रायवर होते. रिटायर्ड झाल्यावर मोकळा वेळ घालवण्यासाठी त्यांनी रिक्षा खरेदी केली आणि बस चालकाचा रिक्षा चालक झाला.
कायतरी नवीन करण्याचा उद्देश ठेऊन त्यांनी रिक्षात टीव्ही, एल ई डी लायटिंग आणि एसी बसवली. बेळगाव परिसरातील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो आले आणि राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीही आल्या. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या व्यक्तींचे फोटोही त्यांनी बसवले आणि ही रिक्षा जगावेगळी केली.
आवड आणि सवड याचे गणित जमल्याने हे करू शकलो. मनात आले तर रिक्षा काढतो आणि भाडे करतो नाहीतर विश्रांती घेतो. दोन अडीच लाख खर्च आला म्हणून प्रवाशांना लुटत नाही. माफक भाडे घेतो. आता पैसे कमवणे हा आपला उद्देश नाही. असे शेख यांनी बेळगाव live कडे सांगितले.