अनेकांची डोखेदुखी ठरलेल्या आणि सुरुवातीपासूनच विरोध होत असलेल्या कडोली येथील मास्टर प्लॅन चे काम काही ग्राम पंचायत सदस्य व नागरिकांनी गुरुवारी बंद पाडले.
मागील काही दिवसापासून हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कोणालाही विश्वासात न घेता या कामाला चालना देण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ड्रेनेज पाण्याची नियोजन न करण्यात आल्याने आणि ज्या नागरिकांची घरे या प्लॅन मध्ये जाणार आहेत त्यांना नुकसान भरपाई
न देण्यात आल्याने सुरूवातीपासून या प्लॅनला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. मागील वेळीही अशाच प्रकारे विरोध करून अधिकाऱ्यांना परतवून लावण्यात आले होते आताही हे काम बंद पाडण्यात आले आहे.
बसवाणा मंदिर पासून गौरी नाल्यापर्यंत (व्हाळ) हा रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्याचे कंत्राट एन एस चौगुले यांना हे कंत्राट देण्यात आला आहे. मात्र नागरीकांचा होत असलेला विरोध पाहून गुरुवारी सकाळ पासूनच या कामाला विरोध करून हवं काम बंद पाडण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावर उतरून याला विरोध करत होते.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य यल्लपा कुट्रे सुनील कासार, सदन संभाजी, मदन संभाजी, प्रकाश मरगाळे, अमीन ताशीलदार, मनोहर कुट्रे, कल्लाप्पा कुट्रे, लक्ष्मण डोंगरे, शिवाजी कुट्रे, जोतिबा केदारी, यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोपर्यंत याबाबत नुकसान भरपाई मिळत नाही हे काम बंद ठेवावे अशी मागणी होत होती.