माजी खासदार एस बी सिदनाळ आणि माजी आमदार फिरोज सेठ तसेच अशोक पट्टण आदी नेत्यांनी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी बेळगावला लिंगायत उमेदवारचा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य माणिकम टागोर यांच्याकडे केली आहे.
लोकसभा उमेदवार पडताळणी करण्यासाठी टागोर हे आज बेळगावला आले होते.हॉटेल संकम मध्ये त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांशी त्यांनी बैठक केली.
लिंगायत मतदार जिल्ह्यात आणि लोकसभा मतदारसंघात जास्त आहेत त्यामुळे भाजप ला तोंड द्यायचे असल्यास लिंगायत उमेदवार देणे आवश्यक असल्याचे टागोर यांना सांगण्यात आले आहे. बैठकीनंतर प्रत्येकाला स्वतंत्र भेटून टागोर यांनी त्यांची मते घेतली.
या बैठकीनंतर रामदुर्ग मतदारसंघाचे माजी आमदार अशोक पट्टण यांनी जर पक्षाने तिकीट दिले तर आपण निवडणूक लढवण्यास तयार आहे असे पत्रकारांना सांगितले. नागराज यादव यांनीही आपण इच्छुक असल्याची माहिती दिली आहे.
माजी खासदार सिदनाळ हे आपले चिरंजीव शिवकांत सिदनाळ यांना उमेदवारी मिळवून घेण्याच्या नियोजनात आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना लिंगायत उमेदवारच कसा योग्य ठरेल यावर भर दिला आहे.
सध्या रमेश जारकीहोळी बैठकीत नसल्याने
यावंरून आता विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील यांचे नाव मागे पडत चालल्याचे दिसत आहे कारण विवेकराव हे रमेश जारकीहोळी समर्थक आहेत माजी खासदार सिदनाळ यांच्या मागे मोठी राजकीय लॉबी असल्याने आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर दबाव वाढवत आहेत. बेळगाव चिकोडी आणि विजापूर येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांची मते काँग्रेस प्रभारीनी जाणून घेतली.
अंगडीचे दुकान बंद करू-मोहन
यावेळी बेळगावात अधिक राजकारण करणार नाही मात्र कोणत्याही परिस्थितीत अंगडी यांचे दुकान बंद करणार असे वक्तव्य
काँग्रेस प्रभारी पी सी मोहन यांनी केले आहे.ते हॉटेल संकम मध्ये पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी अधिकाधिक योग्य उमेदवार देऊन राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणू असेही ते म्हणाले.