Saturday, April 27, 2024

/

बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या वर नियंत्रण आणा-आरबीआय संचालकांकडे मागणी

 belgaum

satish maratheबँकांचे व्यवहार सुरळीत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने विशेष धोरण राबवावे त्यामूळ बँका आठवड्यातून सहा दिवस तत्पुरतेने सेवा देईल त्याचा फायदा ट्रेड कॉमर्स इंडस्ट्री आणि मोठयाआर्थिक संस्थाना होईल अशी मागणी भारतीय रिजर्व्ह बँकेचे मुख्य संचालक सतीश मराठे यांच्याकडे करण्यात आली आहे.सिटीझन कौन्सिलच्या सदस्यांनी अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली यांची भेट घेऊन केली मागणी आहे.

एका वर्षात 15 राष्ट्रीय सुट्ट्या,52 रविवार,24 दुसरा आणि चौथा शनिवार,या व्यतिरिक्त इ एल सी एल राज्य सरकारच्या व्याप्ती तील वेगळ्या अश्या प्रमाणे सुट्ट्यांचे प्रमाण अधिक आहे त्यामुळं देशाचा आर्थिक विकास आर्थिक धोरण ठरत नाही हा एक चिंतेचा विषय बनला आहे. जरी सुट्ट्याना विरोध नसला तरी प्रत्यक्षात याचा फटका व्यापारी उद्योजक आणि सामान्यांना बसत आहे.यावर आर बी आय ने धोरण राबवावे अशी लेखी मागणी करण्यात आली आहे.नोट बंदी नंतर पंतप्रधान जवळपास 18 तास काम करतात असे असताना देशासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले काम वाढवण्याची गरज आहे असे देखील त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

देश 2020 वर्षात महासत्ता म्हणून पुढे जात असताना आर बी आय कडून आर्थिक नीती ठरवताना मेहनत आणि योग्य दिशेतून मार्गक्रमण करण्याची गरज आहे ज्यावेळी देशातील प्रत्येक सरकारी खाते आपले योगदान 100 टक्के देतंय त्यावेळेस देश बलशाली होणे सहज होते.सध्या अबकारी आयकर जी एस टी किंवा स्थानिक स्वराज संस्था यांना कर भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीची गरज आहे त्यामुळे ट्रेड कॉमर्स इंडस्ट्री आणि मोठयाआर्थिक संस्था हे चार मोठे खांब यामुळे सांभाळले जात आहेत. मात्र आजच्या घडीला बँक हॉलिडे मूळे सर्वजण त्रस्त झाले आहेत अनेकांचे व्यवहार ठप्प होत आहेत कित्येकदा अनेकांना दंड सोसावा लागत आहे. यासाठी आर बी आय धोरण राबवण्याची गरज आहे जेणे करून आठवड्यातून सहा दिवस बँका सुरू राहतील गरज असेल तेंव्हा नागरिकांना बँक तत्परतेने सेवा देऊ शकेल.

 belgaum

नोट बंदी नंतर जनता कॅश लेस व्यवहाराकडे वळली आहे मात्र हे व्यवहार करताना बॅंका अतिरिक्त कर आखत आहेत त्यामुळे प्रत्येक माणसाला एका वर्षात सातशे आठशे अधिक चार्ज म्हणून खर्च करावे लागत आहे हा नवीन भुर्दंड आहे ही बाब देखील निदर्शनास आणून दिली.यावेळी विकास कलघटगी, शेवंती भाई शाह, मराठा बँकेचे बाळासाहेब काकतकर आदी उपस्थित होते.सुट्ट्या वर नियंत्रण म्हणून आर बी आय मानव विरहित बँक सुरू करण्याचे धोरण आखत आहे असे आश्वासन सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.