Friday, April 26, 2024

/

‘तिलारी धबधब्यात एकजण बुडाला’

 belgaum

मित्राचा वाढ दिवस साजरा करण्यासाठी तिलारीला गेलेल्या एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्तिकगौडा हणमंत गौडा पाटील वय 24 रा.श्रीनगर धारवाड असे या घटनेत बुडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

TIlari

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिक हा आपल्या इतर तीन मित्रासह रवी नावाच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी धारवाडहुन तिलारीला गेला होता.मंगळवारी सायंकाळी सगळ्यांनी केक कापुन धबधबा असलेल्या ठिकाणी पोहायला गेले असता कार्तिक बुडाला.

 belgaum

त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला बुडू नये म्हणून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याला वाचवू शकले नाहीत.मंगळवारी रात्री सदर घटना ग्रामीण पोलिसांना कळली त्या नंतर बुधवारी मृतदेह शोध मोहीम हाती घेण्यात आली.

ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून बेळगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यात घडलेली ही तिसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.