बेळगाव शहरातील आणखी ८ रस्ते स्मार्ट होणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून या रस्त्यांचा विकास होणार आहे. २३ कोटी १४ लाख ६२ हजार रुपये खर्च करून ही विकासकामे होणार आहेत.
ऑटो नगर रोड, रिलायन्स ऑफिस रोड, स्टेडियम मागील रोड, उदय स्कुल रोड, केपीटीसीएल सब स्टेशन रोड, कणबर्गी तलाव रोड आणि क्रॉस रोड या रस्त्यांचा यामध्ये समावेश राहील.
सध्या १८ रस्ते स्मार्ट करण्याचे काम सुरू असून यापैकी एकही रस्ता सुरू झाला नाही. त्यामुळे अजून स्मार्ट रस्ता कसा असतो याचा अनुभव बेळगावच्या लोकांना आलेला नाही.
पहिल्या टप्प्यात केपीटीसीएल रोड आणि मंडोळी रोडचे काम सुरू करण्यात आले पण अजून हे रोड स्मार्ट झालेले नाहीत त्यातच काँग्रेस रोड, संगोळी रायन्ना सर्कल ते मार्केट पोलीस स्टेशन, कपिलेश्वर कॉलनी रोड, एसपीएम रोड, महात्मा फुले रोड, भाजी मार्केट रोड, शुक्रवार पेठ, जिजामाता चौक ते संगोळी रायन्ना सर्कल आणि मार्केट पोलीस स्थानक ते सर्किट हाऊस या रस्त्यांना स्मार्ट करण्याचाही प्रस्ताव आहे.