नेहमी ए पी एम सी मार्केट च्या आतील बाजूस भरणारा जनावरांचा बाजार चक्क रस्त्यावरच भरला होता त्यामुळे काही प्रमाणात रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.
रायबाग चिकोडी भागात जनावरांना काळू बाई रोगाची लागण झाल्याने अनेक जनावरे दगावत आहेत त्यामुळे या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून जनावरांना एकत्रित आणू नये बाजार ए पी एम सी भरू नये असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे त्यामुळे शनिवारी बेळगावातील ए पी एम सी आत भरणांना बाजार रस्त्यावर भरला होता.जनावरांना ए पी एम सी मध्ये प्रवेश देण्यात न आल्याने विक्री साठी आलेली जनावरे रस्त्याच्या शेजारी थांबली होती.
ए पी एम सी रोडच्या दोन्ही बाजूनी जनावरांना वाहून नेणारे टेम्पो आणि जनावरे थांबली होती त्यामुळे याचा फटका रहदारीला होत होता.जिल्हाधिकारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ऐवजी कुठे बाजार भरवावा याची माहिती दिली नाही.