Friday, April 26, 2024

/

‘रेल्वेच्या धडकेत महिला ठार’

 belgaum

गेट ओलांडताना रेल्वेने दिलेल्या धडकेत एक महिला ठार झाल्याची घटना चौथ्या रेल्वे गेटवर बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे.उल्मीसलमा अल्लाउद्दीन ढवळेश्वर, वय 33 न्यू बाबले गल्ली, अनगोळ-बेळगांव असे रेल्वेच्या धडकेने ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्मीसलमा यांना कानाने थोडे कमी ऐकू येत होते. नेहमीप्रमाणे सकाळी उल्मीसलमा मॉर्निंगवॉकसाठी गेल्या होत्या. अनगोळमधील चौथे रेल्वे फाटक ओलांडताना कमी ऐकू येणाऱ्या उल्मीसलमा यांना पटरीवरून धावणाऱ्या रेल्वे मालगाडीचा आवाज ऐकू आला नाही. यावेळी रेल्वे पटरी ओलांडणाऱ्या उल्मीसलमाला मालगाडीची जोरदार धडक बसली. या धडकेने उल्मी सलमा यांचा जागीच मृत्यू झाला.

उल्मी सलमाच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक बी. टी. वालीकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.