शाळेत इतर मित्रांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी बोकनूर तालुका बेळगाव येथें घडली आहे.
अरमान गुलाब सनदी वय 13 रा.बोकनूर असे या घटनेत मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरमान हा नववीत शिकत होता शाळेत मित्र त्याला त्रास करत होते अशी किरकोळ कारणे या घटनेनंतर समोर आली आहेत.राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केली.बेळगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
रेल्वेखाली झोकून युवकाची आत्महत्या
आई वडिलां सोबत किरकोळ कारणा मुळे झालेल्या वादा नंतर चिडून एका 22 वर्षीय युवकाने स्वतःस रेल्वे खाली झोकून देऊन आत्महत्या केली.सुळेभावी रेल्वे स्थानका जवळ नाल्याजवळ ही घटना घडली आहे.
विश्वनाथ अनिल इंगळे वय 22 रा
.सुळेभावी असे या युवकाचे नाव आहे. रेल्वे पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.