थकीत ऊस बिलाचे आश्वासन मिळाल्यावर शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच बंद केलेलं आंदोलन शेतकऱ्यांनी पुन्हा सुरू केलं आहे.शनिवारी सकाळी पासून बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी शनिवारी सकाळीच आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांच्या बरोबर बैठक करून देतो असे आश्वासन दिले.
केंद्र किंवा राज्य ही दोन्ही सरकारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरली आहेत असा आरोप म्हादई आंदोलक विनय कुलकर्णी यांनी केलाय जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. आंदोलक शेतकरी भजन म्हणत आंदोलन करत आहेत या आंदोलनात सिद्ध गौडा मोदगी,राघवेंद्र नायक,जयश्री गुरणणावर आदी सामील झाले आहेत.
सोमवार पासून बेळगावात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे त्यामुळं नक्कीच सरकारची डोकेदुखी वाढली आहे.