बेळगावच्या सिटी सर्व्हे कार्यालयात नागरिकांचे सर्व्हे करण्यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी कर्नाटक राज्य महसूल मंत्री आर व्ही देशपांडे यांच्याकडे करण्यात आली आहे. येथील भ्रष्टाचार निर्मुलन आणि सामाजिक संस्था तर्फे हे निवेदन देण्यात आले आहे.
नामदेव मोरे, शिवाजी कागणिकर, आनंद माळी आणि नागेश देसाई उपस्थित होते. सर्व भूमी रेकॉर्ड ऑनलाईन करण्याचा सरकारचा उद्देश वेगळा आहे. या उद्देशात त्या विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असून नागरिकांना वेळेत आपले कामे पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत, असे निवेदनात लिहिले आहे.
बेळगावच्या एडीएलआर आणि डीडीएलआर कार्यालयात नागरिकांना मदत व्हायचे सोडून अडथळेच फार येत आहेत. याचा विचार करून योग्य ती कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे.