Tuesday, April 23, 2024

/

अपहरण केलेला व्यक्ती गायब

 belgaum

काल मार्केट पोलीस स्थानकाजवळून अपहरण करण्यात आलेले ते बालक रात्री उशिरा सापडले. मात्र अपहरण करणारा व्यक्ती अजून गायब असून त्याचा शोध मार्केट पोलिस घेत आहेत.

अनगोळ भागात अपहरण झालेल्या बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीचे नाव महम्मद शफी असे असल्याची माहिती मिळाली असून तो हैद्राबाद ला पळून गेला असल्याचे समजते. अपहरण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेन्यायासाठी मार्केट पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

KIdnaped child
नानाप्पा इराप्पा नाईक (वय ५) रा. उळागड्डी खानापूर ता. हुक्केरी असे त्या बालकाचे नाव असून त्याचे काल अपहरण झाले होते. मोटारसायकल वरून त्याला घेऊन जाणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. यावरून माग काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.