Saturday, April 27, 2024

/

अपहरण झालेले बालक सापडले

 belgaum

काल मार्केट पोलीस स्थानकाजवळून अपहरण करण्यात आलेले ते बालक रात्री उशिरा सापडले आहे. अनगोळ भागात अपहरण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन मार्केट पोलिसांनी आठ तासांच्या आत त्या बालकाची सुटका केली आहे.

KIdnaped child
नानाप्पा इराप्पा नाईक (वय ५) रा. उळागड्डी खानापूर ता. हुक्केरी असे त्या बालकाचे नाव असून त्याचे काळ पै हॉटेल जवळून अपहरण झाले होते. मोटारसायकल वरून त्याला घेऊन जाणार अपहरण कर्ता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

यावरून माग काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.भाजी विक्री करणाऱ्या आपल्या आई सोबत तो बेळगावला आला होता. या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 belgaum

 

पोलिसांनी बसवलेल्या कॅमेऱ्यात हे बालक  अपहरण होताना कैद झालं होतं त्यामुळं या सी सी टीव्ही फुटेज मुळे ती दुचाकी आणि बालकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.