पतंग उडविताना आजकाल वेगवेगळे अपघात घडत आहेत. जी मुले पतंग उडवितात त्यांना याचे भान नसते. त्यामुळे त्यांच्या पालकांनी त्यांना याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे जर मांजा किंवा पतंगामुळ कोणतही अपघात घडल्यास मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येत, असा इशारा, पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी दिला आहे
पतंग उडवा पण सुरक्षितपणा जपणे गरजेचे आहे. गांधीनगर येथे मांजा लागून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे यापुढे काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळं याचा विचार करण्यात यावा असा इशारा पोलिस आयुक्त डॉ डी सी राजाप्पा यांनी दिला आहे.
सावधान राहा अपघात घडू देऊ नका याची काळजी घ्या माझ्यामुळे विद्युत लाईन बिघाड होण्याचे प्रकारही घडत आहे त्यामुळे हेस्कॉमला वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. तर या पतंगाचा काही लहान मोठे पक्षी यांना फटका बसत आहे त्यामुळे पालकांवर गुन्हे दाखल करू असा इशारा दिला आहे.
मुलांनी जबाबदारीने पतंग उडवला पाहिजे. रस्त्यावरून ये जा करणाऱ्याला इजा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.