बेळगाव शहरात सहकार क्षेत्राचे जाळे खूप मोठे आहे अनेक पथ संस्थानी यशस्वी कारभार करून नाव लौकिक मिळवला आहे असे असताना दिवाळखोरी निघालेल्या संस्थांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.गेल्या पाच वर्षात चार संस्थानी ठेवीदारांना चुना लावला त्यात आश्रय वित्त संस्था, संगोळी रायन्ना,भाजी मार्केट व्यापारी आणि सिद्धार्थ या पथ संस्था डब घाईला गेल्या आहेत आता दिवाळखोरी करणारी पुढची संस्था कोणती असणार याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
गेल्या दहा वर्षात बेळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर फोफावले असून या लहान लहान पथ संस्थांमधील गुंतवणूक पंधराशे कोटीहून अधिक आहे.या पथ संस्था मधील स्पर्धाही तितक्याच वेगाने वाढत चालली आहे मात्र या संस्थां मधून जनतेनी विश्वासानं ठेवलेल्या ठेवी सुरक्षित नसल्याचे चित्र समोर येत आहे.
गेल्या वर्ष भरा पूर्वी आश्रय या वित्त संस्थेने बेळगावच्या स्थानिक ठेवीदारांना चारशे कोटींचा चुना लावला त्या पाठोपाठ संगोळळी रायन्ना संस्थेने 600 कोटी रूपयांच्या ठेवी बुडवल्या.आता शिवाजी नगर येथील सिद्धार्थ सोसायटीची गत या पथ संस्था प्रमाणेच झाली आहे.सदर पथ संस्थेतील ठेवीदार हे सर्व सामान्य व कष्टकरी समाजातील असून या संस्थेकडे सुमारे सहा कोटींच्या ठेवी जमा झाल्या होत्या मात्र संचालकां पैकी बऱ्याच जणांनी मोठ्या रक्कमेची उचल केल्याने संस्था डबघाईला आली आहे.विशेष म्हणजे याही पथ संस्थेत प्रतिष्ठित नागरिक समाजातील मान्यवरांचा भरणा आहे.
ठेवीदारांनी संस्थतील कर्मचाऱ्यांना या विषयीचा जाब विचारत बाहेर खेचल्याची घटना घडून हे प्रकरण पोलीस स्थानका पर्यंत पोचले आहे मात्र या विषयी स्पष्ट खुलासा झालेला नाही त्यामुळं संस्थेतील लहान ठेवीदार चिंतेत पडले आहेत.भाजी मार्केट येथील व्यापारी लोकांची पथ संस्था देखील मोठी अडचणीत सापडली असून संचालक ठेवीदारांना दाद द्यायला तयार नाहीत त्यामुळे प्रामुख्याने बेळगाव शहरातील लहान लहान सहकारी पथ संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. यापुढे शहरातील ठेवीदार व ग्राहकांनी आपण पैश्याची गुंतवणूक ठेवी कोणत्या संस्थेत ठेवायला पाहिजे या विषयी जागरूकता बाळगणे गरजेचे झाले आहे.
बहू संख्य सहकारी पथ पेढ्यावर सहकार खात्याचे नियंत्रण न राहिल्यानेच असे प्रकार वाढीस लागले आहेत पथ संस्थेत ग्राहकांनी ठेवलेल्या ठेवी सुरक्षित आहेत की नाही हे पहाण्याची जबाबदारी संचालकांची असते मात्र ही जबाबदारी संचालकांनी प्रामाणिक पणे पार पाडल्याचे दिसत नाही.
-जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे
क्रमशः…..