मणिपूर येथील मार्केट मधून 20 जवानांना घेऊन जाणाऱ्या सी आर पी एफ च्या गाडीवर नक्षलवाद्यांनी ग्रॅनाईड फेकून हल्ला करताना ग्रेनाईड झेलून ग्रेनाईड सकट गाडीतून बाहेर उडी मारून आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या वीर योद्धयाला साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
वीस जणांचे जीव वाचवून आपल्या प्राणाची आहुती देणारे गोकाकचे सुपुत्र शहीद जवान उमेश हेलवारे याच्यावर सोमवारी शासकीय वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
मणिपूर येथे नक्सलवाद्यांनी सी आर पी एफ गाडीवर केलेल्या हल्ल्यात सी आर पी एफ चा जवान उमेश हेलवारे यांनी नक्षलवाद्यांनी टाकलेला ग्रेनाईड झेलून गाडी बाहेर उडी मारून वीस जणांचे प्राण वाचवले होते.शनिवारी ही घटना घडली होती. बाहेर उडी घेतली होती जर ग्रेनाईड गाडीत फुटला असता तर वीस जवान दगावले असते मात्र जीवाची कोणतीही पर्वा न करता उमेश याने ग्रॅनाईड हल्ला बाहेरच्या बाहेर थोपवून लावला. गेल्या चार वर्षांपासून तो मणिपूर भागात सेवा बजावत होता.
शनिवारी त्याला वीर मरण प्राप्त झाल्या वर खास विमानांनी सोमवारी सकाळी त्याच पार्थिव बेळगावला आणण्यात आले होते.विमानतळा वर अनेकानी श्रद्धांजली वाहिल्या नंतर पार्थिव गोकाक कडे रवाना झाले.जिल्हाधिकारी एस बोमनहळळी यांनी गोकाक येथे आदरांजली वाहिली.सी आर पी एफ च्या जवानांनी उमेश पार्थिव त्याच्या गोकाक येथील मूळ आंबेडकर नगर येथील घरात नाते वाईकांना सोपवले त्या नंतर पार्थिव वाल्मिकी मैदानावर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. संपूर्ण शासकीय इतमामत गोकाक येथे अंतिम संस्कार करण्यात आले.