Home बातम्या ‘ता.पं.तील मराठी सदस्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न
belgaum

‘ता.पं.तील मराठी सदस्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न

0
‘ता.पं.तील मराठी सदस्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न
 belgaum

 belgaum

तालुकापंचायत मध्ये अधिक तर मराठी सदस्य आहेत. मराठी परिपत्रके देण्यात येत असली तरी त्यांचे नामफलक मात्र कन्नड आणि मराठीत लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा नामफलक मराठीत लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

सुरुवातीला केवळ कन्नड मधेच नामफलक लावण्यात आला होता. त्यामुळे मराठी सदस्यांतर्फे तत्कालीन कार्यकारी अधिकारी एस के पाटील यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. त्यामुळे आपल्याला मराठीत नामफलक लावण्यात यावा अशी मागणी केली होती. यानंतर याकडे दुर्लक्ष करून सदस्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला.

Tp marathi boards

मात्र तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, रावजी पाटील, नारायण नलावडे आदी मराठी सदस्य यांनी सर्वसाधारण सभेत आवाज उठवून मराठीतून फलक लावण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर कन्नड आणि मराठीतून नामफलक लावण्यात आला. त्यामुळे मराठी सदस्यांनी कन्नड आणि मराठीत फलक नको तेथे केवळ मराठीतून नामफलक हवा, अशी मागणी केली आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. मागिल काही महिन्यापासून हा फलक तसाच ठेवण्यात आला आहे. हा फलक बाजूला करून त्याजागी मराठी लिहिलेलाच फलक बसवावा अशी मागणी करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.