बेळगावच्या दुर्गामाता दौडमुळे तरुण वर्गात देश प्रेम जागृत होण्या बरोबरच नवं चैतन्याचे वातावरणही निर्माण होत आहे.गेली अनेक वर्षे दररोज सकाळी लवकर उठुन दौड मध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे.
फ़ोटो सौजन्य: महेश पाटील
वर्षभर नऊ वाजता अंथरुणातुन बाहेर पडणारे देखील दौडच्या वेळी पहाटे उठून दौड मध्ये सहभागी होतात हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल.दुर्गामाता दौडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या नऊ वर्षा पासून दौड मध्ये एक कुत्रा नऊ दिवस नियमित पणे सहभागी होत असतो.दौडचे दररोजचे सुरुवातीचे ठिकाण आणि सांगता होण्याचे ठिकाण वेगवेगळे असले तरी हा कुत्रा दौडीच्या प्रारंभी बरोबर वेळेवर हजर असतो.
दौड मध्ये असणारी हजारो लोकांची गर्दी त्यांच्या कडून केली जाणारी घोषणाबाजी वाद्यांचा गजर यामुळे हा कुत्रा जराही बिथरत नाही किंवा गडबडून जात नाही संपूर्ण दौडच्या मार्गावर एकाच गतीने सगळ्या बरोबर धावून आपली निष्ठा आणि भक्तीचे दर्शन घडवत असतो.
हा कुत्रा कुणाचा याची उत्सुकता पोटी माहिती मिळवली असता शहापूर अळवण गल्ली येथील पवन कदम यांचा असल्याचे समोर आले आहे.सध्या दुर्गामाता दौडी मध्ये भगवे वस्त्र परिधान करून सहभागी होणारा हा कुत्रा दौडीत सहभागी होणाऱ्यांचा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.