Friday, March 29, 2024

/

‘मनोकामना पूर्ण करणारी महालक्ष्मी’

 belgaum

हिंदवाडी महिला मंडळाचे महालक्ष्मी मंदिर समस्त बेळगावकर जनतेचे श्रद्धास्थान आहे.हिंदवाडी महिला मंडळाने काही वर्षांपूर्वी हिंदवाडीत महालक्ष्मी मंदिर स्थापन करण्याची योजना आखली.

Hindwadi mahalaxmi

महिलांनी पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन मंदिर उभारण्यासाठी निधी गोळा केला.त्यावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले पण त्यावर मात करून महिलांनी मंदिर उभारून तेथे महालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

 belgaum

मंदिरातील महालक्षमीची मूर्ती अत्यंत सुबक अशी आहे.मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केल्यावर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.वर्षभर मंदिरात विविध कार्यक्रम सुरु असतात.

नवरात्रीत तर मंदिर भक्तांनी फुलून गेलेले असते.नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.नऊ दिवस विविध रुपात देवीची पूजा करण्यात येते.महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते.भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी असाच महालक्ष्मी मंदिराचा लौकिक पसरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.