मालवाहू ट्रकने थांबलेल्या सी बी टी बसला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बंद मधील एक जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान पुणे बंगळुरू राष्ट्रीय महा मार्गावर भूतरामहट्टी क्रॉस जवळ हा अपघात घडला आहे. सदाशिव चनमनाप्पा माळगी वय 58 वर्षे रा. वंटमुरी बेळगाव असं मयताचे नाव असून दोघे जण गंभीर जखमी आहेत जखमी वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
काकती पोलीस उपनिरीक्षकानी बेळगाव live ला दिलेल्या माहितीनुसार बस वंटमुरीहुन सी बी टी कडे जात होती त्यावेळी भूतरामहट्टी जवळ बस थांबली असता कांदा वाहून नेणाऱ्या ट्रक ने मागून जोराची धडक दिली त्यात हा अपघात झाला आहे.कांदा वाहू ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाली हायवे वर कांदा पसरला होता मात्र सुदैवाने ट्रक चालक वाहक या अपघातात बचावले आहेत.
ट्रकने मागून इतकी जोराची धडक दिली की बस या अपघातात हायवे वरून सर्व्हिस रोड वर आली होती.काकती पोलीस निरीक्षक सुलेमान ताशीलदार आणि पी एस आय हांचीनमनी यांनी पहाणी केली. काकती पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.