बीएचएमएस व बीएएमएस लोक एलोपॅथिक प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्यावर कारवाई
स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी हा मुद्दा मांडला.
गोरल यांच्या मागणी नुसार संबंधित डॉक्टर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करा आणि एफ आय आर दाखल करा असे आदेश जिल्हा आरोग्यधिकाऱ्यांना देण्यात आले.
बेळगावं शहरासह जिल्ह्यात आरोग्य विभागाचे शासकीय अधिकारी बी एच एम एस डॉक्टर अलोपथिक प्रॅक्टिस सुरू असतानाही कोणतीच कारवाई न करता मिळेल तो मलिदा खाऊन गप्प बसलेत असा थेट आरोप आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी करताच पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी याकडे डी सिंचे लक्ष वेधले त्यानंतर जिल्हाधिकारी बी एस बोमनहल्ली यांनी गुन्हा घालण्याचे आदेश दिले.
शनिवारी के डी पी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी सहभाग दर्शवला होता.