स्टार गुटखा वरून प्रगती करीत आता विमान उद्योगात झेप घेतलेल्या स्टार घोडावत उद्योग समूहाचे विमान लवकरच बेळगाव विमानतळावरून सुरू होणार आहे. बेळगाव ते तिरुपती या मार्गासाठी परवानगी मिळवण्याच्या हालचाली सुरू असून तिरुपतीची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांना विमानप्रवासाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
स्टार एअर ची दोन विमाने आहेत. त्यापैकी एक विमानाला हुबळी ते दिल्ली या रुट वर परवानगी मिळाली असून उडाण योजनेतून हे काम झाले आहे. आणखी एक विमान ही कंपनी खरेदी करणार आहे. ते विमान आले की बेळगाव येथुन तिरुपती साठी विमानसेवा देण्याचा कंपनीचा विचार आहे.
आजपर्यंत तिरुपती ला जाणारे भाविक रेल्वे, बस किंव्हा खासगी वाहनातून जात होते. पण आता विमानातून तिरुपतीच्या डोंगरावर उतरण्याची संधी मिळाल्यास कमी वेळात तिरुपतीला जायला मिळेल आणि दर्शन घेऊन लगेच परतता येईल.