सध्या जिल्हा काँग्रेस मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणूक व पक्ष संघटनेवर होऊ देणार नाही असे मत प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्षा ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले आहे.
उमेदवार निवडीचा अधिकार हाय कमांडला आहे स्थानिक नेत्यांसोबत असलेला वाद बेळगाव पुरता मर्यादित आहे.पक्ष वाढी बळकटीसाठी मी सज्ज आहे मात्र माझ्याकडे मतदार संघाचा विचार केल्यास जनतेला न्याय मिळवून देण्यास आंदोलन देखील करू असे देखील त्या म्हणाल्या.
रमेश जारकीहोळी हे माझ्या पेक्षा मोठे नेते आहेत डी के शिवकुमार यांच्या सोबत झालेलं भांडण सोडवायला त्यांचं त्यांनी समर्थ आहेत. काँग्रेस प्रभारी बैठकीत डी के शिवकुमार विरुद्ध रमेश जारकीहोळी वाद झाला अश्या बातम्या आलेत त्या चुकीच्या आहेत माझ्या माहिती प्रमाणे बैठकीत तसं काही घडलंच नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुक उमेदवार निवडीवरून वाद झालाय हे खरं आहे मात्र आमच्या पी एल डी प्रकरणा वरून वाद झाला अश्या मीडियात आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत.लोकसभा निवडणुकीत जारकीहोळी ब्रदर्स यांनी दिलेल्या उमेदवारास माझा संपूर्ण पाठिंबा देते माझ्या मतदार संघातून 53 हजार आघाडी देईन असेही त्या म्हणाल्या.