बेळगाव जिल्हा काँग्रेस नेत्यांत अनेक वाद असताना पुन्हा एक नवा वाद समोर आलाय तो लोकसभा निवडणुकीतील तिकीट वाटपा वरून झाला आहे. बेळगाव जिल्हा काँग्रेस मध्ये नेत्यांतील वाद मिटता मिटेना झालेत.
बंगळुरू येथे चिकोडी आणि बेळगाव लोकसभा निवडणुकीतील सीट साठी समन्वय समितीची बैठक झाली या बैठकीत काँग्रेस प्रभारी वेणू गोपाल यांच्या समोर रमेश जारकीहोळी आणि माजी आमदार फिरोज सेठ यांच्यात संघर्ष झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
बेळगाव लोकसभेची जागा मुस्लिम समाजाला हवी आपणाला लोकसभेच तिकीट द्या अशी मागणी सेठ यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली त्यावेळी रमेश जारकीहोळी यांना हे तिकीट आपले बंधू सतीश जारकीहोळी किंवा विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील यांना द्यायचे आहे त्यामुळं दोघात बैठकीवेळी मोठया आवाजात गरमा गरमी झाली लागलीच खासदार वेणूगोपाल यांनी मध्यस्थी करून वाद शमवला.
सध्या पी एल डी बँक प्रकरण, पत्रकार परिषदेत खुर्ची मिळवण्या वरून सेठ आणि काँग्रेस प्रभारी असे अनेक वाद असताना हे लोकसभा सीट साठीचे भांडण समोर आले आहे.मागील निवडणुकीत राज्यात सत्ता असतेवेळी जिल्ह्यात केवळ सहा आमदार होते आता राज्यात 80 आमदार असले बेळगावात पूर्वी पेक्षा अधिक 8 आहेत दोन आमदार वाढल्याचं श्रेय नक्कीच रमेश जारकीहोळी यांना जातंय त्यामुळे पालक मंत्र्यांचं वजन पक्ष श्रेष्ठींकडे अधिक आहे त्यातच उत्तर मधून पराभव झाल्यावर सेठ यांनी तिकिटाची मागणी केल्याने पालकमंत्र्यांचा पारा चढला असावा अशी शक्यता आहे.