बेळगावची लाडली तुरमुरी गावची कन्या मलप्रभा जाधव हिने इंडोनेशिया मध्ये बेळगावचा झेंडा फडकविला असून ज्यूडो मधल्या कुरास या प्रकारात भारताचे मेडल निश्चित केले आहे.मलप्रभा ने सलग तीन साखळी सामने जिंकले आहेत.
तिसऱ्या क्वाटर् फायनल सामन्यात व्हिएतनाम च्या व्हेन नोगास चा 5- 0 पराभव करत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे.
तत्पूर्वी तिने पहिल्या साखळी सामन्यात फिलीपाईन्स च्या दावा हेलन चा 3-0 ने केला पराभव केला. दुसऱ्या सामन्यात तिने तुर्कमणिस्तान च्या सापरोवा जरीना हिचा 10-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला होता.
केंद्रीय खेळ मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी स्वतः मलप्रभेचा सामना पहिला.प्रेक्षकांत उपस्थित राहून राठोड यांनी बेळगाव च्या कन्येचा आत्मविश्वास वाढवत प्रोत्साहन दिले होते.
तिन्ही सामन्यात जाधव ने प्रतिस्पर्धी खेळाडूला 1 पॉईंट सुद्धा स्कोर करायला दिला नाही एकतर्फी पराभव केला आहे.आता सेमी फायनल कडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.मात्र या तुरमुरीच्या कन्येने इतिहास घडवत देशासाठी एक पदक नक्की केलं आहे. मेडल चा रंग कोणता ते सेमी फायनल किंवा फायनल मध्ये समजणार आहे.