Friday, March 29, 2024

/

‘शिल्पा शेट्टी करणार बेळगावातील अनाथ संस्थेस मदत’

 belgaum

अभिनेत्री शिल्पा शेट्टी बेळगावातील एका अनाथ आश्रमास मदत देणार आहे सलमान खान च्या दस का दम या शो मध्ये जिंकलेली दहा लाख रुपये रक्कम अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा बेळगावातील अनाथ मुलांच्या संस्थेस मदत करणार आहेत. मुंबईतील मिड डे या दैनिकात आलेल्या बातमी नुसार शो मध्ये जिंकलेली रक्कम शिल्पा शेट्टी फौंडेशनला देणार आहे त्यातून बेळगावातील संस्थेस मदत मिळणार आहे.

गेल्या ८ वर्षा पासून शेट्टी हिने समाज कार्य सुरु करून पुढाकार घेतलाय याद्वारे अनेक मुलांना तिने आश्रय दिला आहे नुकताच जिंकलेली रक्कम ती बेळगावातील अनाथ आश्रमाचे पुनर निर्माण करण्यात वापरणार असल्याचे तिने म्हटलंय. बेळगावातील ६० एच आय व्ही पिडीत मुल असलेल्या या अनाथ आश्रमाला मदत करणार असून माझा पती राज कुंद्रा आणि मी अनेकदा मदत जेवणआणि इतर मदत केलेली आहे. या पैश्यातून नवीन इमारत बांधून या आश्रमाच पुनरनिर्माण करणार आहे यच आधुनिकीरण करण्यासाठी ४० ते ५० लाख खर्च अपेक्षित आहे मात्र ही सुरुवात असल्याच म्हटलंय मात्र बेळगावातील त्या संस्थेच नाव मात्र गुप्त ठेवल आहे.

shilpa shetty bgm
बेळगावातील त्या अनाथ मुलांना आधार मिळेल त्यांच्या बद्दल माझ्या मनात एक वेगळाच आदर आहे एकदा प्रवासात असतेवेळी त्या अनाथ आश्रमा बद्दल मी वाचले होते मी ज्या तरुंना बद्दल वाचले आहे की जो एकटाच एच आय व्ही पिडीत मुलांना सांभाळण्याचे काम करतोय ती मुले एच आय व्ही पिडीत आहेत म्हणून त्या तरुणाने दत्तक घेतली आहेत त्या मुलांना आश्रय आणि शिक्षण देतोय अशी माहिती मी वाचली त्यामुळे मदत देण्याचा निर्णय घेतलाय असे त्या म्हणाल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.