Wednesday, December 25, 2024

/

भिडे गुरुजींची बेळगावात सभा झालीच पाहिजे-शंकरगौडा

 belgaum

भिडे गुरुजींचा कार्यक्रम बेळगावात झालाच पाहिजे महाराष्ट्र शासनाने भीमा कोरेगाव मध्ये क्लीन चिट दिली असताना कर्नाटक सरकारने बंदी घालणे अयोग्य आहे अशी भूमिका भाजप किसान मोर्चा उपाध्यक्ष शंकर गौडा पाटील यांनी मांडली आहे.

SHankar gowda

मंगळवारी शिव प्रतिष्ठान संघटनेने भिडे गुरुजी वरील बंदी उठवा अशी मागणी केल्या नंतर याबाबत चर्चा सुरू झाली आहे. शिव प्रतिष्ठांनच्या माध्यमातून गुरुजीने अनेक देश भक्त तयार केलेत महाराष्ट्रात ते अनेक भाषण करू शकतात मात्र कर्नाटक सरकारने द्वेषाने त्यांच्या भाषणावर बंदी घातली आहे ती बंदी उठवावी अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे.
पुढील महिन्यात जो बेळगावात गुरुजींच्या  भाषणाचा  कार्यक्रम व्हायला हवा. आम्ही सुद्धा त्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.

प्रतिष्ठान व्यतिरिक्त इतर संघटना आणि नेत्यांची वक्तव्ये आल्याने बेळगाव प्रशासनाला भिडे गुरुजींची बेळगाव बंदी उठवण्यासाठी नक्कीच दबाव वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.