बेळगाव शहर आणि उपनगरातील सर्व स्मशान भूमी आता सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे तसेच विद्युत दिव्यांची चौवीस तास सोय करण्यात येणार आहे.माजी महापौर किरण सायनाक यांनी मंगळवारी सकाळी झालेल्या महा पालिकेच्या मासिक सर्वसाधारण बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला असता महापौरांनी वरील प्रमाणे निर्णय दिला.
काल शहरातील शहापूर स्मशानभूमीत स्त्री अर्भकाला जिवंत गाडण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा तुन झाला होता त्याचे पडसाद स्थानिक वृत्तपत्रातून उमटताच पालिका प्रशासनाला जाग आली आणि हा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला.
पालिकेत स्वछतेचा गाजला मुद्दा
स्वच्छ भारत योजनेत बेळगाव पालिकेची देश आणि राज्य पातळीवर घेतलेल्या नामांकानात झालेली घसरण यामुळे स्वच्छतेचा मुद्दा देखील मंगळवारी झालेल्या बैठकीत चांगलाच गाजला. शहराच्या स्वच्छतेत कोट्यावधी रुपये खर्चून देखील स्वच्छतेत शहर कमी पडत असल्याची टीका जेष्ठ नगरसेवक आणि उपस्थित आमदारांनी केली त्यामुळं आगामी सात दिवस निरीक्षण करण्याचे निर्णय घेण्यात आला.
महापौर बसप्पा चिखलदिनी,उपमहापौर मधूश्री पूजारी जेष्ठ नगरसेवक आणि आमदार आगामी सात दिवस सकाळी सात ते नऊ च्या दरम्यान कचऱ्याची कशी उचल केली जाते याची पाहणी करण्याचे ठरवण्यात आले.
विधान सभा निवडणुकी नंतर पालिकेची पहिलीच सर्वसाधारण बैठक झाली होती या बैठकीस आमदार अनिल बेनके,अभय पाटील आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हजेरी लावली होती मात्र नूतन आमदारांची पहिलीच बैठक असल्याने पालिकेने नवीन निवडून आलेल्या नूतन आमदारांचे अभिनंदन केले नाही याबद्दल आमदार अभय पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.