बेळगाव छावणी सीमा परिषदेस( कॅन्टोमेंट बोर्ड) कर्नाटक सरकार कडून निधी ध्या अशी मागणी नगर प्रशासन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.कॅन्टोमेंट बोर्डाच्या वतीन निवेदन देऊन सदर मागणी करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी शहरातील शासकीय विश्राम धामात कॅन्टोमेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या शिवराम, सदस्य साजिद शेख यांनी ही मागणी केली आहे.
कर्नाटक शासनाने बेळगाव कॅन्टोमेंट बोर्डाला एक पत्र देऊन कळवले होते की ‘बेळगाव छावणी सीमा परिषदेला राज्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून राज्याच्या यादीत समविष्ट करण्यात आले आहे या नुसार कर्नाटक वित्त आयोगाच्या अंतर्गत राज्यातील कोणत्याही नगर पालिकेस जसा अनुदान मिळतो तसं पात्र असेल’ असे असताना राज्य महा पालिका संचानालयाचा आदेश असताना कॅन्टोमेंट बोर्ड राज्य वित्त आयोगा (State Finance Commission)कडून कोणताही निधी मिळवत नाही. बेळगाव छावणी परिषद कर्नाटकातील एकमेव कॅन्टोमेंट बोर्ड आहे म्हणून राज्य शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे.
निवेदनाचा स्वीकार करून मंत्री रमेश जारकीहोळी यांनी या विषयी सकारात्मक पावले उचलली जाती असे आश्वासन दिले. यावेळी विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील देखील उपस्थित होते.