तुम्ही जर घर बांधणार असाल आणि घराचे मंदिर झाले तर काय कराल? असे काही सांगितले तर नवलच वाटते. मात्र अशी घटना बेळगाव तालुक्यात घडली आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कणबर्गी येथील सिद्धराम कलखांबकर या शेतकऱ्याच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे. या शेतकऱ्याने घर बांधण्यासाठी आपल्या जागेत खोदाई केली होती. मात्र घडले वेगळेच.
ज्यावेळी शेतात खोदाई सुरू होती. त्यावेळी त्या शेतकऱ्याला पुरातन काळातील शिवलिंग आणि बसवाण्णा यांची मूर्ती आढळल्या. त्या मुळे या शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला.
त्या शेतकऱ्याने फार विचार करुन त्या जागी आता शिवालय उभारण्यास सुरुवात केली आहे. भक्तीपुढे आपल्या स्वप्नातील घराला त्याने ब्रेक दिला आहे.
तसेच त्याने मंदिर परिसरात रोपांची लागवड केली आहे. या ठिकाणी तो छोटीशी बाग तयार करत असून त्यासाठी वनखात्याची मदत हवी आहे. हे पाहण्यासाठी परिसरातील नागरीकांची गर्दी होत आहे.
देवानेच आपल्याला ही संधी दिली आहे. चांगले घर बांधून राहण्याची आपली इच्छा होती पण देवाच्या मनात दुसरेच होते आता तीच इच्छा पूर्ण करून मंदिर उभारणार आहे असे तो सांगत आहे.